1✔️राष्ट्रीय हरित लवाद (NGT) हे एक .....................आहे.
अ) घटनात्मक ब) वैधानिक क) अर्धन्यायिक ड) नियामक
2✔️..................... या शहरात ‘बायो एशिया समिट २०२०’ आयोजित केली गेली.
अ) बंगळुरू ब) मुंबई क) हैदराबाद ड) दिल्ली
3✔️..................... या शहरात ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायपीठ विषयक अखिल भारतीय परिषद २०२०’ आयोजित केली गेली.
अ) चेन्नई ब) भोपाळ क) रायपूर ड) नवी दिल्ली
4✔️फेब्रुवारी २०२० मध्ये ..................... या शहरात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्र्यांनी ‘गल्फूड २०२०’ या कार्यक्रमामध्ये भारतीय मंडपांचे उद्घाटन केले.
अ) दुबई ब) मस्कत क) आबुधाबी ड) दमास्कस
5✔️.....................या शहरात ६५ वा ‘अॅमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२०’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अ) पणजी ब) शिमला क) गुवाहाटी ड) मुंबई
6✔️..................... या शहरात दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय उघडले गेले.
अ) चेन्नई ब) बंगळुरू क) कोची ड) हैदराबाद
7✔️कोणत्या रेलगाडीमध्ये देवासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे?
अ) काशी महाकाल एक्सप्रेस ब) उज्जैन महाकाल एक्सप्रेस
क) महाकाल एक्सप्रेस ड) काशी-उज्जैन महाकाल एक्सप्रेस
8✔️‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB)’ प्रयोगशाळा .....................या शहरात आहे
अ) नवी दिल्ली ब) पुणे क) कोलकता ड) शिमला
9✔️जानेवारी-फेब्रुवारी २०२० या काळात चर्चेत असलेले ‘ग्रॉस रेव्हेन्यू (GR)’, ‘अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (AGR)’ आणि ‘लायसेन्स फी (LF)’ हे शब्द .....................याच्याशी संबंधित आहेत.
अ) परकीय चलन ब) सकल राष्ट्रीय उत्पन्न
क) दूरसंचार क्षेत्र ड) कंपनीच्या जमाखर्चाचा लेखा जोखा
10✔️.....................या शहरात दहावी ‘जागतिक पेट्रोकोल परिषद’ आयोजित करण्यात आली.
अ) पुणे ब) लखनौ क) नोएडा ड) नवी दिल्ली
11✔️कोणत्या देशाने त्यांच्या विकसनशील देशांच्या यादीतून भारताला वगळले?
अ) जपान ब) अमेरिका क) ब्रिटन ड) रशिया
12✔️..................... या दोन शहरांच्या दरम्यान भारताची पहिली आंतर-शहरी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
अ) कानपूर - लखनौ ब) अहमदाबाद - मुंबई
क) मुंबई - पुणे ड) दिल्ली - अमृतसर
13✔️कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची घोषणा केली?
अ) केरळ ब) महाराष्ट्र क) तामिळनाडू ड) पंजाब
14✔️‘द क्रॉसफायर ऑफ लव्ह’ ही कादंबरी ..................... यांनी लिहिली आहे.
अ) धीरेन तिवारी ब) विक्रम सेठ क) किरण देसाई ड) शोभा डे
15 ✔️‘MOSAiC अभियान’ .....................याच्याशी संबंधित आहे.
अ) आर्क्टिक हवामान ब) उष्णकटिबंधीय हवामान
क) सुदूर संवेदी ड) भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)
16✔️‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ .....................या शहरात आहे.
अ) मुंबई ब) हैदराबाद क) पुणे ड) पणजी
17✔️‘घाऊक किंमत निर्देशांक’ (WPI) याच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
(१) सध्या, WPI याच्यासाठी आधारभूत वर्ष २००४-०५ हे आहे.
(२) हे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून प्रकाशित केले जाते.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
अ) केवळ (१) ब) केवळ (२)
क) (२) आणि (२) दोन्ही ड) (१), (२) दोन्ही नाही
18✔️‘पॉलीक्रॅक’ तंत्रज्ञान ..................... याच्याशी संबंधित आहे.
अ) कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती ब) पेट्रोलियम पदार्थांची निर्मिती
क) ब्लॉकचेन तंत्रज्ञान ड) 3-D तंत्रज्ञान
19✔️शैलेश नायक समिती कशाशी संबंधित आहे?
अ) कावेरी पाणी तंटा ब) कर सुधारणा
क) किनारपट्टी नियंत्रण क्षेत्र ड) विमा क्षेत्रातली सुधारणा
उत्तर : १) ब २) क ३) ड ४) अ ५) क ६) ब ७) अ ८) अ ९) क १०) ड ११) ब १२) क १३) ब १४) अ १५) अ १६) क १७) ड १८) अ १९) क
No comments:
Post a Comment