Tuesday, 12 May 2020

'मिशन सागर': क्षेत्रीय मित्र राष्ट्रांच्या मदतीसाठी भारत सरकारची मोहीम.

🔰कोविड-19 महामारीच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने इतर देशांपुढे मदतीचा हात दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'मिशन सागर' अंतर्गत भारतीय नौदलाचे ‘INS केसरी’ हे जहाज इतर देशांसाठी अन्न, आवश्यक औषधे अशी मदत सामुग्री घेवून 10 मे 2020 रोजी रवाना झाले.

🔰मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मॅडागास्कर आणि कॉमोरोस या देशांना मदत पुरवण्यासाठी जहाज रवाना झाले. या जहाजातून अन्नसामुग्री, कोविड-19 महामारीवर उपयोगी ठरत असलेल्या HCQ औषधाच्या गोळ्या आणि विशेष आयुर्वेदिक औषधे तसेच वैद्यकीय सहाय्यकांचे पथक पाठवण्यात आले.

🔴इतर ठळक बाबी

🔰संपूर्ण क्षेत्रामध्ये अशी मोहीम चालवून परदेशांना असा मदतीचा हात पुढे करणारा भारत पहिला देश आहे.

🔰हे अभियान भारत सरकारने 2015 साली आरंभ केलेल्या ‘सागर कार्यक्रम’ (क्षेत्रामधील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास / Security and Growth for All in the Region) याचा एक भाग आहे. कोविड-19 महामारी संकटाच्या काळात क्षेत्रीय देशांना आवश्यक असणारी मदत करून संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ‘मिशन सागर’ राबवण्यात येत आहे.

🔰या मोहिमेची जबाबदारी संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि सरकारच्या इतर संबंधित संस्था/विभाग मिळून संयुक्त समन्वयाने पार पाडत आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...