सध्या संपूर्ण देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाउनदरम्यान करोनाच्या वाढत्या संख्येला काही प्रमाणात आळा बसला असला तरी दररोज रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. भारतात आतापर्यंत करोनाग्रस्तांची संख्या तब्बल ५० हजारांवर गेली आहे. यादरम्यान एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “सध्या दोन गोष्टींकडे प्रामुख्यानं पाहण्याची गरज आहे.
जशी जशी करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, तसं आपण चाचण्याही वाढवत आहोत. जर आपल्याला या लढाईत यशस्वी व्हायचं असेल तर चाचण्या कितीही वाढल्या तर करोनाग्रस्तांच्या केसेस कमी होणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे. जून आणि जुलैमध्ये करोनाचं संक्रमण पीकवर म्हणजेच वेगानं वाढेल,” असं गुलेरिया म्हणाले.
जून आणि जुलैमध्ये करोनाचं संक्रमण पीकवर म्हणजेच वेगानं वाढेल. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतरच करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ रोखली जाईल किंवा ती संख्या कमी होईल. सरकारला कोविड सेंटर्स, चाचण्यांमध्ये वाढ आणि हॉटस्पॉट ठरवण्यात आलेल्या ठिकाणी कठोरपणे नियमांचं पालन करणं सरकारला सुरू ठेवावं लागेल,” असंही त्यांनी नमूद केलं.
No comments:
Post a Comment