Saturday, 9 May 2020

भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढ शून्य टक्के

◾️मूडीज या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने आपल्या ताज्या अहवालात करोनामुळे

◾️ यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढ शून्य टक्के राहिल असं भाकित वर्तवलं आहे.

◾️शुक्रवारी (८ मे २०२०) मूडीजने यासंदर्भातील अहवाल जारी केला. लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची मोठी पडझड होण्याची शक्यता मूडीजने व्यक्त केली आहे.

◾️ २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताच्या अर्थ्यवस्थेची वाढ शून्य टक्क्यांवर अडकून राहिल म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था जैसे थे परिस्थितीत असेल असं मूडीजने म्हटलं आहे.

◾️मात्र २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल असा अंदाजही मूडीजने व्यक्त केला आहे.

◾️ २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होऊन देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढ ६.६ टक्क्यांपर्यंत असेल असंही मूडीजने या अहवालात म्हटलं आहे.

◾️  फिच या संस्थेनेही काही दिवसांपूर्वी असाच इशारा दिला असल्याने आता मूडीजचा अहवाल नक्कीच भारताची चिंता वाढवणार आहे असं म्हटलं जातं आहे.

____________________________________

No comments:

Post a Comment