1) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?
1) 45 वी घटना दुरुस्ती
2) 46 वी घटना दुरुस्ती
3) 42 वी घटना दुरुस्ती
4) 44 वी घटना दुरुस्ती
उत्तर :- 3
2) भारतीय राज्यघटनेचे कलम ‘51अ’ कशा संबंधी आहे ?
1) मूलभूत कर्तव्ये
2) मूलभूत हक्क
3) मार्गदर्शक तत्त्वे
4) राष्ट्रपती
उत्तर :- 1
3) घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश ........................ च्या शिफारशीवरून करण्यात आला.
1) वल्लभभाई पटेल समिती
2) कृपलानी समिती
3) सरकारिया आयोग
4) स्वर्ण सिंग समिती
उत्तर :- 4
4) भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?
1) फ्रान्स
2) यु.एस.ए.
3) यु.एस.एस.आर
4) यु.के.
उत्तर :- 3
5) मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
अ) मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात.
ब) हक्क कर्तव्यांसोबत निगडित असलेच पाहिजेत.
क) कर्तव्ये स्वत:हून लागू होत नाहीत.
ड) अशा प्रकारची कर्तव्ये साधारणत: पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीची आहेत ?
1) अ, क
2) ब, ड
3) ब, क, ड
4) ड
उत्तर :- 4
No comments:
Post a Comment