Wednesday, 6 May 2020

संयुक्त राष्ट्रात तिरुमूर्ती करणार भारताचं प्रतिनिधीत्व

• अनुभवी राजदूत म्हणून नावलौकीक मिळवलेले टी एस तिरुमूर्ती यांची निवड संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधि म्हणून करण्यात आलीय.

• टी एस तिरुमूर्ती हे सध्या परराष्ट्र मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत आहेत. ते भारतीय परराष्ट्र सेवेच्या (Indian Foreign Service) १९८५ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

• तिरुमूर्ती न्यूयॉर्कमध्ये सय्यद अकबरुद्दीन यांची जागा घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणून काम हाताळलेले अकबरुद्दीन गेल्या अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रात देशाचे स्थायी प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते.

• अनेक जागतिक मंचावर वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी भारताची भूमिका चोखपणे मांडली. अकबरुद्दीन हे लवकरच निवृत्त होत आहेत.

• 'परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात आर्थिक प्रकरणांचे सचिव म्हणून कार्यरत असणारे तिरुमूर्ती यांना संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधि म्हणून नियुक्त करण्यात आलंय' अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आलीय.

• तसंच सरकारकडून नम्रता एस कुमार यांची स्लोवेनियामध्ये देशाच्या पुढच्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जयदीप मजूमदार यांच्यावर ऑस्ट्रियामध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलीय.

• संयुक्त सचिव दीपक मित्तल यांना कतारमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलंय. तर पीयूष श्रीवास्तव यांची बहरीनमध्ये भारताच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात आलीय.

No comments:

Post a Comment