Thursday, 21 May 2020

पीएम ई विद्या’: विद्यार्थ्यांना डिजीटल/ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी नवा उपक्रम.

🅾आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या अंतर्गत वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 17 मे 2020 रोजी प्रोत्साहन निधीच्या अंतिम भागातल्या घोषणा केल्या.

🅾टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, याची खातरजमा सरकारने केली आहे.

🅾सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट उपलब्ध नाही, हे लक्षात घेत ‘स्वयम प्रभा’ DTH वाहिन्यांवरून शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे.

🅾तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने ‘पीएम ई विद्या’ हा डिजीटल/ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त आणि विविध उपकरणांच्या माध्यमातून लाभ घेता येईल, असा कार्यक्रम तात्काळ सुरू केला जाणार आहे.

🅾‘पीएम ई विद्या’ अंतर्गत कम्युनिटी रेडियो आणि पॉडकास्टचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे. दिव्यांग बालकांसाठी विशेष डिजीटल साहित्य उपलब्ध करून दिले जाणार.

🅾30 मे 2020 पर्यंत 100 अग्रणी विद्यापीठांना ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

No comments:

Post a Comment