Wednesday, 27 May 2020

चारधाम प्रकल्पाच्या अंतर्गत चंबा बोगद्याचे उद्घाटन.


🔰दिनांक 26 मे 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स मोडच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि MSME मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चारधाम प्रकल्पाच्या अंतर्गत चंबा बोगद्याचे उदघाटन करण्यात आले.

🦋ठळक बाबी...

🔰सीमा रस्ते संघटनेनी (BRO) ऋषिकेश-धारासू रस्ते महामार्गावरील (NH-94 ) व्यस्त चंबा शहराच्या खाली 440 मीटर लांबीचा बोगदा खणून हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला.

🔰उत्तराखंडमधील या ऋषिकेश-धारसू-गंगोत्री रस्त्याची सामाजिक-आर्थिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा बोगदा खुला झाल्यामुळे चंबा शहरातून होणारी वाहतुकीची कोंडी कमी होणार आणि अंतर एक किलोमीटरने कमी होणार तसेच पूर्वीच्या  तीस मिनिटांच्या तुलनेत दहा मिनिटे प्रवासास लागतील.

🔰प्रतिष्ठित चारधाम प्रकल्पातला BRO हा प्रमुख हितधारक असून या बोगद्याचे काम ‘शिवालिक’ चमूने पूर्ण केले आहे. अत्याधुनिक ऑस्ट्रियाई तंत्रज्ञानाचा वापर बांधकामादरम्यान करण्यात आला.

🦋पार्श्वभूमी...

🔰प्रतिष्ठित चारधाम प्रकल्पांतर्गत सुमारे 889 किलोमीटर लांबीच्या अंदाजे 12,000  कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पासाठी पवित्र गंगोत्री आणि बद्रीनाथ मंदिराकडे जाणारा 250 कि.मी. राष्ट्रीय महामार्ग BRO बांधत आहे.

No comments:

Post a Comment