Wednesday, 27 May 2020

हिंदी महासागरातील विशाल टेक्टॉनिक प्लेट होताहेत विभक्त.


🦋हिंदी महासागराखालील विशाल टेक्टॉनिक प्लेट फुटणार असल्याची धक्कादायक माहिती नव्या अभ्यासातून समोर आली आहे.तर ही प्लेट येत्या काळात आपोआप दोन भागांत विभागली जाणार आहे. या प्लेटला भारत-ऑस्ट्रेलिया-मकर टेक्टोनिक प्लेट म्हणून ओळखले जाते.

🦋तसेच ही प्लेट अगदी हळूहळू विभक्त होत आहे, म्हणजेच एका वर्षात ही प्लेट 0.06 इंच (1.7 मिलीमीटर)ने विभक्त होत आहे.

🦋लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, या अभ्यासाचे संशोधक ओरेली कोडुरियर यांनी सांगितले की, ही एक अशी रचना नाही जी वेगवान वाटचाल करत आहे.
तसेच ही प्लेट हळूहळू विभक्त होत असल्याचं प्रारंभी संशोधकांना समजलं नव्हतं, परंतु नंतर त्याचा सुगावा लागला. हिंदी महासागरामध्ये एका दोन भयंकर भूकंप झाल्यानंतर पाण्याखाली काही हालचाल झाल्याचंही संशोधकांनी सांगितलं आहे.

🦋11 एप्रिल 2012ला हिंदी महासागरातील इंडोनेशियाजवळ 8.6 आणि 8.2 अशा तीव्रतेचे दोन भूकंप झाले. हे भूकंप टेक्टोनिकल प्लेटच्या आसपास नव्हते, परंतु या प्लेटच्या मध्यभागी असलेल्या एका वेगळ्या ठिकाणावर त्यांचं केंद्रबिंदू दाखवलं होतं.

🦋तर या भूकंपानंतर संशोधकांना असे वाटले की. पाण्याखाली काही हालचाल आहे. ऑरेली कोडुरियर म्हणाले की, “हे एक कोड्यासारखे आहे, कारण ते एकसारख्या प्लेट नसून तीन एकत्रित आहेत, ज्या जोडलेल्या आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार या प्लेट्स विभक्त होण्यासाठी कोट्यवधी वर्षे लागतील.

No comments:

Post a Comment