Tuesday 19 October 2021

राज्यघटना प्रश्नपत्रिका

1)शोषणाविरुद्धच्या मूलभूत अधिकारामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ?

अ) माणसाचा अपव्यापार
ब)  वेठबिगारी
क).कारखाने इ मध्ये बालकांना कामावर
       ठेवणे
ड) धार्मिक स्थळाच्या ठिकाणी
      शोषणाबाबत

1) अ, ब,क।            2) फक्त अ आणि क
3) फक्त ब,क,ड       4) वरील सर्व

2) सद्सदविवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण,आचरण व प्रसार इ घटनेद्वारे पुढीलपैकी कोणत्या तरतुदींच्या अधीन राहून प्राप्त होते ?

अ) सार्वजनिक सुव्यवस्था

ब) नितीमत्ता

क) आरोग्य

ड) संबंधित भागातील विशिष्ट तरतुदी

1) फक्त अ                      2)  अ,ब,क
3) वरील सर्व.                  4) एकही नाही

3) कृपान धारण करणे व स्वतः बरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या प्रगटीकरणा बाबत समाविष्ट असल्याचे मानले जाईल अशी घटनेत कोठे तरतूद आहे ?

1) अनुच्छेद 25

2)अनुच्छेद 26

3) अनुच्छेद 27

4) घटनेत नमूद नाही

4) राज्यघटनेत एकमेव अशा कोणत्या
      ठिकाणी " हिंदू " शब्द नमूद आहे ?

1) अनुच्छेद 25 (1)

2) अनुच्छेद 25 (2)

3) अनुच्छेद 26 (1)

4) अनुच्छेद 26 (2)

5) राज्यघटनेत " हिंदू धर्म " या एकमेव धर्माचा उल्लेख मूलभूत अधिकारात आढळतो तर या शब्दातच पुढीलपैकी कोणत्या धर्माचा ही समावेश होतो ?

अ) बौद्ध

ब) जैन

क) शीख

ड) ख्रिशन

1) फक्त अ                   2) अ आणि ब
3) अ,ब,क                   4) एकही नाही

6) अनुच्छेद 26 अंतर्गत धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य नमूद आहे त्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ?

अ) धार्मिक,धर्मादायी संस्था स्थापन करून स्वखर्चाणे चालवण्याचा

ब) धार्मिक बाबीमध्ये आपल्या व्यवहाराची  व्यवस्था पाहण्याचा

क) जंगम,स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व संपादन करण्याचा

ड) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा

1) अ,ब,क                        2 ) ब,क
3) ब,क,ड                         4) वरील सर्व

7) ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे अथवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी नियोजित केलेले असे कोणतेही कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाणार नाही  अशी तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे ?

1) अनुच्छेद 25

2) अनुच्छेद 26

3)अनुच्छेद 27

4) अनुच्छेद 28

8)  भारतात सद्या पुढीलपैकी कोणते धर्म
      हे अल्पसंख्यांक धर्म म्हणून
     ओळखले जातात ?

अ) मुस्लिम

ब) बौद्ध

क) जैन

ड) शीख

इ) ख्रिशन

1) ब,क,ड                     2)अ,ब,क,ड
3) ब,क,ड,इ।                 4) वरील सर्व

9) अचूक विधान शोधा
     (सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार )

अ) भारतात कोणालाही " धर्म " बदलता
       येतो परंतु " जात " बदलता येत नाही

ब) हिंदू हा फक्त " धर्म "  नसून ही एक  "
      संसकृती " आहे

1) फक्त अ                      2) फक्त ब
3) दोन्ही.                        4)एकही नाही

10) अनुच्छेद 25 मध्ये नमूद असलेल्या " धर्म स्वातंत्र्य " या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणता अर्थ नमूद होतो असा  निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ?

अ) धर्म स्वीकारणे

ब)  धर्म नाकारणे

क) धर्म निरपेक्ष राहणे

ड) धर्माला विरोध करणे

1)अ,ब,क               2) फक्त अ आणि ब
3) वरील सर्व           4) एकही नाही

आजचा संपूर्ण पेपर धार स्वातंत्र्याच्या  अनुच्छेद 25,26,27,28 यावर काढलेला आहे घटनेतील बारकावे कव्हर केलेले आहेत..सर्वनी पेपर सोडवावा.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✅  राज्यघटना उत्तरे  ✅

1)- 1

2)- 3

3)- 1 ( अनुच्छेद 25 (1) मध्ये तरतूद
           आहे )

4)- 2 ( अनुच्छेद 25 (2) मध्ये हिंदू
          हा शब्द नमूद आहे या शब्दाच्या
           अंतर्गतच इतर धर्माचा अर्थही
           समाविष्ट आहे असे सर्वोच्च
            न्यायालयाने स्पष्ट केले आहे

5)- 3 ( अनुच्छेद 25(2) नुसार तरतूद
         आहे परंतु या हिंदू शब्दामध्ये
         मुस्लिम आणि ख्रिशन धर्माचा
           समावेश नाही
6)- 4

7)- 3

8)- 4

9)- 3

10)- 1  ( धर्माला विरोध करण्याचा
        अधिकार राज्यघटना कोणत्याही
         ठिकाणी देत नाही )

💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment