Monday, 11 May 2020

वटवाघुळ आणि खवल्या मांजराच्या संमिश्रणातून करोना व्हायरसची निर्मिती?


सार्स-Cov-2 विषाणू Covid-19 च्या जगभरात होत असलेल्या फैलावाला कारणीभूत ठरला आहे.

- संपूर्ण जगामध्ये थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसची निर्मिती वटवाघुळ आणि खवल्या मांजराच्या संमिश्रणातून झालेली असू शकते.  सार्स-Cov-2 विषाणू Covid-19 च्या जगभरात होत असलेल्या फैलावाला कारणीभूत ठरला आहे. या सार्स-Cov-2 विषाणूची निर्मिती वटवाघुळ आणि खवले मांजरामध्ये आढळणाऱ्या करोना व्हायरसच्या संमिश्रणातून झालेली असू शकते, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

-  या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, खवले मांजरामधून सार्स-Cov-2 विषाणूचे माणसामध्ये संक्रमण झाल्याची शक्यता आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

- दक्षिण चीन शेती विद्यापीठाशी संबंधित असणाऱ्या वेटरीनरी मेडिसीन कॉलेजमधील तज्ज्ञांनी हा संशोधन अहवाल जनरल नेचरमध्ये प्रसिद्ध केला आहे. खवले मांजराचा जगभरात मोठया प्रमाणावर व्यापार चालतो. या मांजरामध्ये सार्स Cov-2 सारखे विषाणू आहेत.

-  वन्यजीवांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा सूचक इशारा या अहवालातून देण्यात आला आहे.
चिनी वैज्ञानिकांनी मलायन खवल्या मांजरामधून करोना व्हायरस वेगळे काढले. त्या करोना व्हायरसच्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिडमध्ये सार्स Cov-2 चे चार जीन्स आढळून आले.

-  मलायन खवल्या मांजरामध्ये आढळलेला करोना व्हायरस सार्स Cov-2 सारखाच आहे.
जीनोमच्या साखळीमधून असे लक्षात आले की, खवल्या मांजरामधील Cov सार्स-Cov-2 आणि वटवाघुळामधील सार्स-Cov RaTG13 शी समान आहे. फक्त एस जीनमध्ये फरक होता. वटवाघुळामध्ये करोना व्हायरस असतो. तिथून तो खवल्या मांजरामध्ये आला असवा. त्या संमिश्रणातून सार्स-Cov-2 विषाणूची निर्मिती होऊन मानवी संक्रमण झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. 

- खवल्या मांजराच्या रक्ताचा औषध निर्मितीसाठी वापर होतो तसेच दक्षिणपूर्व आशियाई देशांमध्ये खवल्या मांजराच्या मांसाला मागणी आहे.

- करोना व्हायरसची निर्मिती वुहानच्या लॅबमध्ये झाली असा अमेरिकेचा आरोप आहे. लॅबमध्ये कोणाकडून तरी चूक झाली, त्यामुळे आज जगभरात या व्हायरसचा फैलाव झाला.

- करोनाचा पहिला रुग्ण त्या लॅबमध्ये आहे असे वृत्त अमेरिकेतील फॉक्स न्यूजने काही दिवसांपूर्वी दिले होते.
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...