Saturday 2 May 2020

चंद्रावरून पडलेल्या उल्केचा होणार लिलाव.

🔰ख्रिस्तीज् या जगविख्यात लिलाव कंपनीने चंद्रावरून पृथ्वीवर पडलेल्या एका उल्केचा खासगी लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
13.5 किग्रॅ वजनाची ही उल्का साधारणपणे फूटबॉलएवढी मोठी असून, तिची 20 लाख पौंड (18.96 कोटी रुपये) एवढी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे.

🔰पृथ्वीवर सापडलेल्या चंद्रावरील सर्वात मोठ्या उल्कांपैकी ही एक असून, ती आफ्रिकेतील सहारा वाळवंटात सापडली होती. ती ज्याला सापडली त्याच्यापासून अनेकांना विकली जाऊन आता ती लिलावासाठी उपलब्ध झाली आहे, असे ख्रिस्तीजकडून सांगण्यात आले.
एखादा लघुग्रह किंवा धुमकेतू आदळून चंद्राच्या पृष्ठभागाचा तुटलेला हा तुकडा पृथ्वीवर पडला  असावा, असे मानले जाते.

🔰अमेरिकेच्या ‘नासा’ने चंद्रावरील दगडांचे जे नमुने आणले आहेत त्यांच्याशी तुलना करून ही उल्काही चंद्रावरचीच असल्याची खात्री करून घेण्यात आल्याचेही या लिलाव कंपनीचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...