Thursday, 7 May 2020

राज्य ३१ मे पर्यंत करोनामुक्त झालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंचे आदेश :

राज्यात वेगाने पसरणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ क़ॉन्फरन्सिंगवरुन बैठक घेतली व ३१ मे पर्यंत राज्य करोनामुक्त करण्याचे आदेश दिले.

‘प्रत्येक जिल्हा ग्रीन झोन बनलाच पाहिजे. भले मग त्यासाठी तुम्ही कितीही कठोर भूमिका घ्या’, असे उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले.

‘स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आवश्यक निर्णय घेऊ शकतात. पण करोना नियंत्रणात आणण्याच्या बाबतीत कुठलीही हयगय अजिबात सहन करणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले’. दैनिक भास्करने हे वृत्त दिले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

ठळक बातम्या २९ मार्च २०२५.

१.एबेल पुरस्कार २०२५ - मसाकी काशीवारा यांना - ७८ वर्षीय जपानी गणितज्ञांना बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील योगदानाबद्दल. २. ...