Wednesday, 27 May 2020

बेनामी मालमत्ता म्हणजे काय?


🅾 दुसऱ्याच्या नावावर खरेदी केलेली मालमत्ता म्हणजे बेनामी मालमत्ता होय. ज्याच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते, त्याला बेनामदार म्हणतात. जो मालमत्तेचे पैसे दतो, तो तिचा खरा मालक असतो. आणी ही मालमत्‍ता ज्‍याच्‍याजवळ असते त्‍यास बेनामी मालमत्‍ता म्‍हणतात.

🅾बेनामी व्यवहार म्हणजे असे व्यवहार, ज्यात मालमत्ता ज्याचे नावे रजिस्टर केली जाते, ती व्यक्ती त्या व्यवहाराचे पैसे देत नाही. कोणी तरी दुसरीच व्यक्ती त्याचे पैसे अदा करते. अन्य कोणाच्या तरी फायद्यासाठी दुसराच कोणी तरी हे व्यवहार करीत असतो.

🅾 उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांतून पत्नी अथवा मुलांच्या नावे खरेदी केलेली मालमत्ता, भाऊ, बहीण अथवा अन्य नातेवाईकांच्या नावे घेतलेली अशी मालमत्ता जिची किंमत उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांतून अदा करण्यात आलेली आहे. कुळांच्या नावे घेतलेली, पण या व्यवहारात विश्वस्त अथवा लाभधारक असलेली मालमत्ता. ही मालमत्‍तेला बेनामी मालमत्‍ता म्हणतात.

🅾ज्ञात स्रोताबाह्य उत्पन्नातून पत्नी व मुलांच्या नावे खरेदी केलेली मालमत्ता, भाऊ अथवा बहिणींसोबत भागिदारीत घेतलेली अज्ञात स्रोतांच्या पैशांतील मालमत्ता. कुळांच्या नावे घेतलेली मालमत्ता. याचा अर्थ असा होतो की, कोणी आपल्या आई-वडिलांच्या नावे मालमत्ता घेतली असेल, तर तीही बेनामी मालमत्ता होऊ शकते.

🅾 चल - अचल संपत्ती, कुठल्याही प्रकारचे हक्क अथवा हित, कायदेशीर दस्तावेज, सोने, वित्तीय रोखे इ. कोणत्याही प्रकारच्या संपत्तीसाठी केलेले सर्व व्यवहार बेनामी व्यवहारात येतात.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...