Wednesday, 6 May 2020

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना.

🔰 जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत आदिवासी विकास विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे विस्तारीकरण करीत या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया…

🔰 डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा १

🔰अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, मातामृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांच्या आहारातील उष्मांक आणि प्रथिनामध्ये वाढ करणे आणि जन्माला येणाऱ्या सुदृढ बालकांचे प्रमाण वाढविणे, यासाठी अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या आहारासाठी नोव्हेंबर २०१५ मध्ये डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली.

🔰 यात अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेतून सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळेचा चौरस आहार देण्यात येत आहे. गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत तर स्तनदा मातांना प्रसूतीनंतर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी या योजनेचा लाभ देण्यात आहे. त्यामुळेउष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

🔰 राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (NFHS-२०१५-१६) नागरी व ग्रामीण अशी वर्गवारी लक्षात घेता ग्रामीण भागातील स्त्रियांमधील ॲनोमियाचे प्रमाण ४९.९ टक्के तर निकषापेक्षा बीएमआय कमी असलेल्यांचे प्रमाण ३० टक्के एवढे आहे.

🔰आदिवासी क्षेत्रात हे प्रमाण अधिक असल्याने गरोदर स्त्रियांना शेवटचे तीन महिने एक वेळा सकस आहार देण्याऐवजी गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून आहार दिल्यास ॲनेमियाचे प्रमाण कमी होऊन बीएमआय वाढविणे शक्य होईल. या उद्देशाने डॅा. भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत आहे.

🔰 गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळा चौरस आहार देण्याचा कालावधी वाढवून स्त्री गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून बाळांतपणापर्यंत तसेच स्तनदा मातांना पहिले सहा महिने एकवेळा आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता गरोदर असल्याचे निश्चित झालेल्या स्त्रियांची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्रात करतात.

No comments:

Post a Comment