Friday, 29 May 2020

मराठी व्याकरण :- वाचा महत्त्वाच्या म्हणी


1 कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
अर्थ:
लाजलज्जा पार सोडून देणे.

2 कठीण समय येता कोण कामास येतो?
अर्थ:
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही.

3 कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच.
अर्थ:
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही.

4 कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी.
अर्थ:
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते.

5 कर नाही त्याला डर कशाला?
अर्थ:
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.

6 कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
अर्थ:
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही.

7 करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?
अर्थ:
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही

8 करणी कसायची, बोलणी मानभावची.
अर्थ:
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर.

9 करायला गेले गणपती अन् झाला मारुती.
अर्थ:
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे. नाहीतर त्यातून भलतेच घडते.

10 करायला गेलो एक अन् झाले एक.
अर्थ:
करायचे एक आणि झाले भलतेच.

11 करावे तसे भरावे.
अर्थ:
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे.

12 करीन ती पूर्व दिशा.
अर्थ:
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे.

13 कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड.
अर्थ:
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते.

14 कवडी कवडी माया जोडी.
अर्थ:
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते.

15 कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले.
अर्थ:
करणे थोडे पण गवगवाच फार.

16 कसायाला गाय धार्जिणी.
अर्थ:
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात.

17 काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
अर्थ:
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी.

18 काखेत कळसा अन् गावाला वळसा.
अर्थ:
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.

19 काट्याचा नायटा करणे.
अर्थ:
एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे.

20 काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
अर्थ:
खर्‍या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...