Wednesday, 6 May 2020

दारुवर ७०% ‘स्पेशल करोना व्हायरस टॅक्स’, दिल्ली सरकारचा निर्णय

🔶लॉकडाउनमुळे गेला महिनाभर देशभरात दारू विक्रीची दुकाने बंद होती. मात्र, सोमवारपासून ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील दारू विक्रीला अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली. त्यानंतर सर्वत्र दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.

🔶सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न झाल्यामुळे अनेक ठिकाणी दुकानं बंद करावी लागली. दिल्लीमध्येही असंच चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर आता दिल्लीच्या केजरीवाल सरकारने दारुवर ‘स्पेशल करोना टॅक्स’ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

🔶दिल्ली सरकारने दारू विक्रीवर 70 टक्के करोना व्हायरस कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्पेशल करोना फी’अंतर्गत हा कर मंगळवारपासून आकारला जाईल. यानुसार ‘एमआरपी’वर 70% स्पेशल करोना टॅक्स आकारला जाणार आहे. सोमवारी रात्री उशीरा याबाबतचा आदेश दिल्ली सरकारने काढला. मंगळवारी सकाळपासून हा नियम लागू होईल.

🔶दारुच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यास तिथे विक्रीला परवानगी देणार नाही, असा इशाराही केजरीवाल यांनी यापूर्वी दिला आहे. याशिवाय, मंगळवारपासून दिल्लीमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत दारु विक्रीची दुकानं सुरू ठेवायला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.

No comments:

Post a Comment