Wednesday, 27 May 2020

एका वर्षांत दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक.


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🧩ऑस्ट्रेलियात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा प्रस्तावित ट्वेन्टी-२० विश्वचषक लांबणीवर टाकण्यात येणार की नाही याबाबतचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

🧩मात्र पुढील वर्षी भारतातही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक नियोजित आहे. या स्थितीत एकाच वर्षांत सहा महिन्यांच्या अंतराने दोन वेळा ट्वेन्टी-२० विश्वचषक कसा खेळवायचा हा मुख्य प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (आयसीसी) आहे. याबाबत अर्थातच ‘आयसीसी’च्या सदस्यांचे एकमत होत नाही.

🧩‘आयसीसी’च्या आर्थिक आणि व्यापार विभागाच्या समितीची व्हिडीयोद्वारे झालेल्या बैठकीत ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी त्यासाठी उपस्थित होते. जर या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवला तर सहाच महिन्यांच्या अंतराने भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक अशक्य आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...