Sunday, 17 October 2021

सामान्य विज्ञान

- अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात
- इ.स. 1897 मध्ये जे.जे. थॉमस या इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या अणूहून 1800 पट हलक्या कणांचा शोध  लावला.
- सन 1913 मध्ये डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप मांडले.
- सन 1932 मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून दिले.
- सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्‍या पद्धतीने करण्यात आले.
- अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत.
- केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो.
- केंद्राबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनपरभारा एवढाच असल्यामुळे अणू हा विधूतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- पूर्वी अणूत्रिज्येसाठी अॅगस्ट्रोम (A० = 10 -8 cm) हे एकक वापरात होते. आता अॅगस्ट्रोमच्या जागी पिकोमीटर (pm) हे एकक वापरात आहे.
(1 pm = 10 -12 m)
- अणूवस्तूमानांक दर्शविण्यासाठी खास असे अणूवस्तुमान एकक डाल्टन वापरले जाते. (u)
- इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण असून त्याचा निर्देश e असा करतात.
- इलेक्ट्रॉन चे वस्तुमान 0.00054859 u आहे.
- प्रोटॉन हा धनप्राभरित मूलकण असून त्याचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात.
- न्युट्रॉन हे विधूतप्रभारदृष्टया तटस्थ असलेले मूलकण आहेत.
- भ्रमणकक्षा (कवच) मध्ये सामावणार्याल इलेक्ट्रॉनची अधिकतम संख्या
- KLMN या या कावचांमध्ये 2, 8, 18, 32 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकत नाहीत. मात्र कोणत्याही अणूच्या शेवटच्या म्हणजेच सर्वात बाहेरील कवचामध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन सामावू शकतात.
- कवचातील इलेक्ट्रॉनची उर्जा कमी असते.
- हेलियम, निऑन यांसारखी काही थोडी मूलद्रव्ये कोणत्याही अणुबरोबर संयोग न पावता मुक्त अशा अनुस्थिती मध्येच अस्तित्वात असतात.
- अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा असे म्हणतात.
- संयुजा हा अणूचा मूलभूत रसायनिक गुणधर्म आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- अणूच्या बाहयतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात.
- ज्यांचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूची संयुजा शून्य असते.
- अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दर्शविला जातो.
- एखाद्या अणुमधील एकूण प्रोटॉनच्या संखेला अणुअंक म्हणतात व तो Z या संज्ञेने दर्शविला जातो. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- सारखाच अणुअंक परंतु वेगळा वस्तूमानांक असणार्या  अणूंना असस्थानिक असे म्हणतात.
- हायड्रोजनच्या इतर दोन समस्थानिकांना स्वतंत्र नावे असून ती ड्युटेरियम व ट्रिटियम अशी आहेत.
- क्लोरीनचे सरासरी अणुवस्तुमान 35.5 एवढे आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- रेणूवस्तुमानालाच पूर्वी रेणुभार म्हणत. एकक u
- अणु व रेणूंची सापेक्ष संख्या समजण्यासाठी वैज्ञानिकांनी ग्रॅम मोल ही संकल्पना विकसित केली.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...