Wednesday, 6 May 2020

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचा ‘नदी व्यवस्थापनाचे भविष्य’ विषयक ‘आयडियाथॉन’ कार्यक्रम

🔰राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (NIUA) या संस्थांनी कोविड-19 महामारीमुळे नदी व्यवस्थापन धोरणे भविष्यात कशा प्रकारे आकाराला येऊ शकतात याचा मागोवा घेण्यासाठी “नदी व्यवस्थापनाचे भविष्य” विषयक ‘आयडियाथॉन’ आयोजित केले. आयडियाथॉनमुळे नदी व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली.

🔰या कार्यक्रमाच्या अंतर्गत 2 मे 2020 रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये सुमारे 500 जण सहभागी झाले होते. विविध देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमधील तज्ञ यात सहभागी झाले होते.

🔰कोविड-19 महामारीच्या काळात टाळेबंदीमध्ये प्रदूषणाच्या पातळीत घट झालेली दिसून आली आहे आणि त्यामुळे नैसर्गिक वातावरणात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. मात्र ही परिस्थिती किती काळ टिकून राहणार याविषयी चिंता व्यक्त केली गेली. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधण्याच्या उद्देशाने, आयडीयाथॉनमध्ये नद्यांच्या सामाजिक दृष्टिकोनातून अन्य समस्यांचे निराकरण कसे केले जाऊ शकते याची चाचपणी करण्यात आली.

🔰नदी व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष वेधण्यासाठी तसेच नदीशी शहरांची आंतरजोडणी अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

No comments:

Post a Comment