Tuesday, 12 May 2020

अँटिबॉडी’चा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्ट किट तयार

⚡ कोरोनाच्या लढ्यामध्ये भारताला आणखी एक यश मिळाले आहे. भारताने कोविड 19 अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी चाचणी किट तयार केली आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (NIV) पहिली स्वदेशी कोरोना अँटीबॉडी टेस्टिंग किट तयार केली आहे.

💁‍♂️ केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी याविषयी माहिती दिली. अधिक लोकसंख्या असलेल्या परिसरात कोरोना संसर्गावर पाळत ठेवण्यात व कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यास ही किट महत्वपूर्ण भूमिका निभावेल”, असे ते म्हणाले. अडीच तासांमध्ये 90 चाचण्या घेण्याची क्षमता आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

👍 *प्रकल्प राबविणार* : कोविड19 विषाणूवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) हे संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार आहेत.

👌 आयसीएमआरची पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) ही संस्था असून तिच्या सहकार्याने ही लस विकसित केली जाणार आहे. स्वदेशी बनावटीची ही लस बनविण्यात भारताला यश आल्यास ते देशाच्या संशोधन क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार आहे.

📌 या संशोधनासाठी प्राण्यांवर तसेच पुढील टप्प्यांत माणसांवर प्रयोग करावे लागणार आहेत. त्यासाठी परवानग्या वेळेत मिळण्यासाठी आयसीएमआर बीबीआयएलला मदत करणार आहेत. लस तयार करण्यासाठी जगभरात अमेरिका, इंग्लंड, इटली, ब्रिटन, इस्रायल आदी देश प्रयत्नात आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...