Wednesday, 27 May 2020

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, अझिथ्रोमायसिन हानिकारक:

●हायड्रॉक्सी क्लोरोक्विन व अझिथ्रोमायसिन या दोन औषधांचा वापर करोना रुग्णांवर करण्यात येत असला तरी ही दोन्ही औषधे घातक असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.

●या दोन्ही औषधांचा हृदयावर विपरीत परिणाम होत असतो असे सांगण्यात आले.

●विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने आताच्या काळात हायड्रॉक्सी क्लोरोक्विनचे घातक परिणाम लक्षात घेऊन या औषधाच्या करोना रुग्णांवरच्या चाचण्या बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस घेब्रेसस यांनी सांगितले.

●व्हँडरबिल्ट विद्यापीठ व स्टॅनफर्ड विद्यापीठ या अमेरिकेतील दोन संस्थांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे असलेल्या माहितीचा वापर करून असे म्हटले आहे,की १३० देशातील २.१० कोटी लोकांना १४ नोव्हेंबर १९६७ ते १ मार्च २०२० दरम्यान जी औषधे देण्यात आली त्यांचा अभ्यास केला असता हायड्रॉक्सी क्लोरोक्विन व अ‍ॅझिथ्रोमायसिन या औषधांमुळे हृदयावर वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

●करोनाच्या आधीपासून ही औषधे वापरात आहेत. पण आता ती करोनावरील उपचारात समाविष्ट करण्यात आली आहेत.

●अ‍ॅझिथ्रोमायसिन या औषधाने हृदयाचे ठोके अनियमित होत असल्याचे दिसून आले आहे. २.१ कोटी लोकांपैकी ७६८२२ लोकांमध्ये या काळात वाईट परिणाम झाले होते.

●हायड्रॉक्सीक्लोरोक्विनने २१८०८ म्हणजे २८.४ टक्के लोकांवर वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले.

●अ‍ॅझिथ्रोमायसिनमुळे ८९६९२ रुग्णात वाईट परिणाम दिसून आले , हे प्रमाण ६०.८ टक्के आहे. ६०७ रुग्णात दोन्ही औषधांच्या एकत्रित वापराचे दुष्परिणाम दिसून आले .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...