३१ मे २०२०

नक्की वाचा :- स्पर्धा परीक्षेची तयारी करताना...

हल्ली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे एक आव्हान बनले आहे. लॉकडाऊनच्या काळात मानसिकदृष्ट्या सक्षम असण्याबरोबरच सुयोग्य नियोजन तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मदत करतील. त्यासाठी खालील पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता.    

1. वेळापत्रक बनवा : अभ्यासाचा Syllabus, जेवण्याचे आणि झोपण्याचे नित्यक्रमानुसारच वेळापत्रक बनवावे. त्या पद्धतीने गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

2 नोट्स तयार करा : तयारी करताना जो विषय जास्त अवघड वाटतो त्या विषयाचे पुस्तक आधी घ्यावे आणि त्याचे नोट्स तयार करून घ्या. म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळीस गोंधळ होणार नाही.

3. शिस्त पाळा : आपण जे ठरवलंय ते त्याचा पद्धतीने होत आहे कि नाही? हे वेळोवेळी तपासून पाहण्याची सवय लावा. याने नक्कीच फायदा होईल.

4. प्रलोभनांना बळी नको : सोशल मीडिया (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर) तसेच वेळ घेणार्‍या प्रलोभन पासून दूर रहा. याने तुमचा वेळ वाचेल.

5. मॉर्क टेस्ट सोडवून बघा : मागील वर्षाचे टेस्ट पेपर्स सोडवून बघा. मॉर्क टेस्ट दिल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता वाढते. ऑफलाईन टेस्ट सिरीजचा पर्याय निवडा. यामुळे सेंटरमध्ये असल्यासारखे वाटेल व परीक्षेची भीती नाहीशी होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या

══════════════════════ ❀【गंगा】 1. गोमती 2. घाघरा 3. गंगा 4. कोसी 5. यमुना 6. पुत्र 7. रामगंगा ❀【यमुना】 1. चंबळ 2. सिंध 3. बेटवा 4. केन 5. टन...