Saturday, 18 December 2021

शेकडेवारी

1) कोणत्याही संख्येचे दिलेले टक्के काढताना प्रथम 1% (टक्का) अथवा 10% काढा. त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात.

· उदा. 500 चे 10% = 50 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करा.)

· 125 चे 10% = 12.5 अथवा एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह धा.

· 500 चे 30% = 150

· 500 चे 10% = 50

· 30% = 10%×3

· = 50×3 = 150

· 500 चे 8% = 40 (संख्येच्या 1%काढताना शेवटचे दोन शून्य कमी करा अथवा शून्य नसल्यास डावीकडे दोन दशांश स्थळांवर दशांश चिन्ह धा.)

· 500 ची 1% = 5

· :: 500 चे 8% = 40

2) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.

· उदा. 368 चे 12.5% = ?

· 368×12.5/100

· = 368×1/8= 46

3) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.

· उदा. 465 चे 20% = 93

· 465×20/100

· = 465×1/5 ने गुणा = 93

4) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.

· उदा. 232 चे 25% = 58

· 232×25/100

· = 232×1/4= 58

5) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.

· उदा. 672 चे 37.5% = 252

· 672×37.5/100

· = 672×3/8

· = 252

6) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.

· उदा. 70 चे 50% = 35

· 70×50/100

· = 70×1/2

· = 35

7) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.

· उदा. 400 चे 62.5% = 250

· 400×62.5/100

· = 400×5/8

· = 250

8) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.

· उदा. 188 चे 75% = 141

· 188×3/4

· = 141

9) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.

· उदा. 888 चे 87.5% = 777

· 888 × 87.5/100

· = 888×7/8

· = 777

10) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह धा.

· उदा. 25 चे 25% = 6.25

· 25 × 25/100

· = 625/100

· = 6.25

◾️नमूना पहिला ◾️

उदा.

2400 पैकी 144= किती टक्के?

1. 8%

2. 6%

3. 5%

4. 4%

उत्तर : 6%

स्पष्टीकरण :-

टक्के (%) = 144×100/2400=144/24 = 6%

◾️नमूना दूसरा ◾️

उदा.

X चे 7% = 126; तर X=?

1. 1600

2. 1800

3. 1500

4. 1400

उत्तर : 1800

स्पष्टीकरण :-

X × 7/100=126

:: X=126×100/7=18×100 = 1800

◾️नमूना तिसरा ◾️

उदा.

1500 चे 40% = X चे 8%; :: X=?

1. 6000

2. 9000

3. 7500

4. 8500

उत्तर : 7500

स्पष्टीकरण :-

1500×40/100=X×8/100

:: 1500×40=X=8

:: X=1500×40/8=1500×5=7500 किंवा

तोंडी काढताना 8 ची 5 पट = 40, यानुसार 1500 ची 5 पट = 7500

◾️नमूना चौथा ◾️

उदा.

1200 चे 8% = 400 चे किती टक्के?

1. 16%

2. 24%

3. 20%

4. 18%

उत्तर : 24%

स्पष्टीकरण :-

:: X=1200×8/100=400×X/100
:: 1200×8=400×X

:: X=1200×8/400=3×8=24%
किंवा

तोंडी काढताना 400 ची 3 पट = 1200 आणि 8 ची 3 पट = 24%

◾️नमूना पाचवा ◾️

उदा.

A ला B पेक्षा 10% गुण जास्त मुळाले, तर B ला A पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले ?

1. 10%

2. 9%

3. 9 1/11%

4. 11 1/11%

उत्तर : 9 1/11%

सूत्र :

B ला A पेक्षा टक्के कमी गुण = 100×टक्के/100+टक्के = 100×10/100+10= 1000/110 = 9 1/11%

No comments:

Post a Comment