🅾1935 च्या कायद्याने प्रतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.
🅾1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.
🅾संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.
🅾या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.
🅾1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या.
🅾भारतमंत्र्यांचे ‘इंडिया कौन्सिल’ रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली.
🅾मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.
🅾1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.
🅾1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.
🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋
No comments:
Post a Comment