Monday, 11 May 2020

मान्सून 11 जूनला होणार दाखल, स्कायमेटची माहिती

🔰 मान्सून कोलकाता आणि मुंबईत 11 जून रोजी, तर दिल्लीत 27 जून रोजी दाखल होईल, अशीमाहिती स्कायमेटने दिली आहे.

🔰 मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या सर्वसाधारण वेळापत्रकात बदल होत असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

🔰 देशातील चार महिन्यांचा मान्सून हंगाम 1 जूनपासून सुरू होतो. मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पुढे सरकत जुलैमध्ये देशाचा उत्तर भाग व्यापतो.

🔰 तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मान्सून दाखल होण्यास काहीसा विलंब होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

🔰 देशातील परतीच्या पावसाची तारीख 15 ऑक्टोबरच ठेवण्यात आली आहे. यात काही बदल करण्यात आलेला नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...