Friday, 10 April 2020

महामारीच्या काळात सुरक्षित कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी TRIFED आणि UNICEF यांच्यात भागीदारी

- भारतातल्या आदिवासी जमातीचे लोक सुरक्षितपणे आपले काम चालू ठेवण्यासाठी भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) या संस्थेनी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या आंतरराष्ट्रीय संघटनेबरोबर भागीदारी केली आहे.

- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याविषयीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बचत गटांसाठी (SHG) डिजिटल मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक डिजिटल संपर्क धोरण’ विकसित करणे, हे या भागीदारीचे लक्ष्य आहे.

- भागीदारीनुसार, UNICEF बचत गटांना डिजिटल मल्टीमीडिया सामग्रीच्या रूपात माहिती प्रसारित करण्यासाठी आवश्यक ती मदत देणार. तसेच महामारीला प्रतिसादासाठी आभासी प्रशिक्षण देण्यासाठी आभासी कार्यशाळा, मुख्य प्रतिबंधक वर्तन; सामाजिक अंतर राखण्याविषयी सोशल मीडिया मोहीमा; आणि वन्य रेडिओ याविषयी आवश्यक ती मदत दिली जाणार.

- हा उपक्रम सर्व 27 राज्यांमध्ये राबावविला जाणार आहे. देशात सुमारे 18,075 वन धन बचत गट आहेत. त्यापैकी 15 हजार बचत गट डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून वन धन सामाजिक अंतर जनजागृती नि उपजीविका केंद्र’ म्हणून नेमले जाणार आहेत. ही केंद्रे महामारीच्या काळात काय करावे आणि काय करू नये याविषयी जागरूकता निर्माण करणार.

- आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) याची स्थापना 1987 साली झाली. आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करणारी ही राष्ट्रीय पातळीवरील शिखर संस्था आहे.

- संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (United Nations Children's Fund –UNICEF) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक शाखा आहे जी जगभरातल्या बालकांपर्यंत मानवतावादी आणि विकासात्मक मदत पुरविण्यासाठी जबाबदार आहे.

- या संघटनेची उपस्थिती 192 देश आणि प्रातांमध्ये आहे. संघटनेची स्थापना 11 डिसेंबर 1946 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्युयॉर्क शहर (अमेरिका) येथे आहे.
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...