Friday, 3 April 2020

MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाची माहिती

Covid 19 या अचानकपणे आलेले संकटामुळे स्पर्धा परीक्षा देणारे अनेक विद्यार्थ्यांना येण परीक्षा जावळ असलेल्या काळात पुणे सोडून गावी जावे लागले. लायब्ररी-अभ्यासाचे नियमित ठिकाण - रूम सोडून आहे त्या परिस्थितीत घरी जावे लागल्यामुळे comfort zone च्या बाहेर आले आहे. त्यात अनेक विद्यार्थी सर्व पुस्तके सोबत घेऊन गेलेच असतील असे ही नाही.
या काळात मला अनेक लोकांनी कॉल मेसेज करून आपल्या समस्या मांडल्या आहेत.
त्यातील बहुतांश common प्रश्न असे आहेत :
1) परीक्षा कधी होणार?
2) घरी अभ्यासच होत नही
3) link break झाल्या सारखे होत आहे
4) आता परीक्षा पुढे गेल्या मुळे नेमका काय वाचायचे?
5) revision करायचे की reading पूर्ण करायचे?
6) csat stop करू का?
7) जास्त वेळ भेटल्या मुळे competition वाढेल का?
8) mains la कमी वेळ मिळेल?
या आणि या सारखे बरेच प्रश्न आहेत

माझ्या मते याची उत्तरे अशी असावीत :

परीक्षा कधी होणार हे आता स्पष्ट नही परंतु परीक्षा कधी जरी झाली तरी अभ्यासाच्या दृष्टीने अणि मानसिक दृष्टीने परीक्षेसाठी तयार असणे हे आपले कर्तव्य आहे.
बर्‍या पैकी मुलांचे अभ्यास झाले असून आता revision मोड मध्ये आहेत

1) परीक्षा कधी होईल याचा विचार करत बसू नका extra वेळ भेटला आहे score अजून वाढला पाहिजे असा सकारात्मक विचार ठेवुन प्लॅनिंग करा

2) ज्या topics वर test मध्ये score कमी येत आहे त्याचे फक्त revision न करता पुन्हा तो topic नव्याने वाचून काढा.

3) revision सुरू असेल तर वेळ लागू देत पण detail revision करा कारण हा part जेव्हा mains मध्ये repeat होईल तेव्हा हा part वर तुमचे त्या वेळी कमी efforts लागतील अणि आत्ताच mains ch 40% अभ्यास होईल.

4) जो part आपण नेहमी विसरतो त्या part कडे आता लक्ष देऊ शकता.

5) csat pratice थांबवू नका
Csat रोज exam जावळ आहे असा समजूनच करा ( अनेक मुले csat कडे या time मध्ये दुर्लक्ष केल्यामुळे परीक्षेत फटका बसू शकतो)

6)multiple choice questions mcqs रोज सोडवत रहा. Exam च्या आदल्या दिवसा पर्यंत mcqs and csat practice सुरूच ठेवणे योग राहील.

7) अभ्यास होऊन आता परीक्षा पुढे पुढे जात आहे हे frustrating आहे पण जास्त unstable न होता आपला अभ्यासातील momentum सेम ठेवा.

8) परीक्षा पुढे गेल्या मुळे सर्वाना जास्त वेळ भेटणार त्यामुळे competition वाढेल असल्या विचारात ही पडू नका. मला sufficient वेळ आहे अणि मी माझे best देईल येवढाच विचार मनत ठेवा.

9) किती जरी comfort zone च्या बाहेर निघाले असाल तरी minimum 6 तास तरी अभ्यास होईल असा नियोजन करा.

10) ज्यांनी books सोबत nehli नाही त्यांनी please अभ्यास बंद करू नका. Online बरेच material आहे. Telegram वर बरेच links आहेत. Classes च्या टेस्ट series ch soft copies आहेत. Maths- mental ability online question पाहून सोडवत रहा. Mobile internet n pen and paper घेऊन ही या वेळ अभ्यास होऊन तुम्ही पास होऊ शकता फक्त hopes सोडू नका.

11) सर्वात important तुमची प्रकृती सांभाळा. Covid 19 चे सावट तुमच्या जावळ ही फिरकू नये या साठी घरी राहून आपल्या अभ्यासात वेळ घालवावा.

संकटाचे संधीत रूपांतर करा,
तुम्हा सर्वांना तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच भेटेल फक्त आता टेंशन न घेता अभ्यासाचे योग नियोजन लावा.

  

1 comment: