Saturday 4 April 2020

IISc बंगळुरूमध्ये ‘प्रोजेक्ट प्राण’ अंतर्गत स्वदेशी व्हेंटिलेटर विकसित केले.

✅ बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमधल्या वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांनी ‘प्रोजेक्ट प्राण’ अंतर्गत स्वदेशी व्हेंटिलेटर उपकरण तयार केले आहे.
त्यासाठी लागणारे सुटे भाग वाहननिर्मिती उद्योग आणि RO वॉटर फिल्टर उद्योगांकडून घेतले गेले आहेत.

◾️कोविड-19 महामारीसाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने व्हेंटिलेटर उपकरणांची अत्याधिक गरज भासत आहे.
▪️ आयात केलेल्या सुटे भागांची कमतरता दूर करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणात उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे.

▪️व्हेंटिलेटरमध्ये वाहनामध्ये वापरल्या जाणारे प्रेशर सेन्सर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस वॉटर फिल्टर हे भाग महत्त्वाचे असतात.

◾️मोठ्या प्रमाणात उपकरणांच्या उत्पादनासाठी संस्था त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान कोणत्याही उद्योगाला विनामूल्य हस्तांतरित करण्यास तयार आहे आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) या कंपनीने यापूर्वीच प्रणालीमध्ये रस दर्शविला आहे.

No comments:

Post a Comment