◾जगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◾तसेच अनेक वर्षांपासून सीईओ असणाऱ्या व्हर्जिनिया रोमेटी यांच्याकडून अरविंद सहा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारतील.
◾ 62 वर्षीय रोमेटी या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. 40 वर्षांपासून कंपनीच्या सेवेमध्ये असणाऱ्या रोमेटी या 2020 च्या शेवटी निवृत्त होणार असल्याचंही कंपनीने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
◾अरविंद सध्या आयबीएमच्या क्लाऊड आणि कग्नेटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
◾ क्लाऊड तंत्रज्ञान आणि डेटासंदर्भातील कामे या विभागांकडून पाहिली जातात. आयबीएम क्लाऊड, आयबीएम सिक्युरिटी, कग्नेटीव्ह अॅप्लिकेशन्स, आयबीएम रिसर्च अशा चार मुख्य शाखांचे नेतृत्व अरविंद करत आहेत.
◾त्याआधी ते आयबीएमच्या सिस्टीम्स आणि टेक्नोलॉजीच्या डेव्हलपमेंट आणि निर्मिती विभागामध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते.
◾१९९० साली कंपनीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर ते आयबीएमच्या डेटासंदर्भातील उद्योग विभागामध्ये होते.
No comments:
Post a Comment