Thursday, 30 April 2020

आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या मदतीला HCARD रोबोटची साथ.

☄दुर्गापूर येथील CSIR-सेंट्रल मेकेनिकल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या प्रयोगशाळेनी HCARD (हॉस्पिटल केअर असिस्टिव्ह रोबोटिक डिव्हाइस) रोबोटिक उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि नेव्हिगेशनच्या स्वयंचलित तसेच मानवचलित अशा दोन्ही पद्धतीने कार्य करते.

☄संसर्ग झालेल्या लोकांची काळजी घेताना रुग्णालयातल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोविड-19 विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे HCARD रोबोट आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांपासून शारीरिक अंतर राखण्यास मदत करू शकते.

🌑यंत्राची वैशिष्ट्ये...

☄संचालन, रूग्णांना औषधे आणि खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी ड्रॉव्हर अ‍ॅक्टिवेशन, नमुना संकलन आणि दृकश्राव्य संवाद यासारख्या वैशिष्ट्यांसह नियंत्रण कक्ष असलेल्या परिचारिका बूथद्वारे या रोबोटचे नियंत्रण आणि परीक्षण केले जाऊ शकते.

☄या उपकरणाची किंमत 5 लक्ष रुपयांहून कमी आहे आणि त्याचे वजन 80 किलोहून कमी आहे.

No comments:

Post a Comment