🔰अमेरिकन जिऑलॉजिकल सर्वे, नासा आणि ल्यूनर प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट यांनी गेल्या पन्नास वर्षांतील विविध चांद्रयान मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीच्याआधारे चंद्राचा डिजिटल मॅप तयार केला आहे.त्याचा उपयोग पुढील चांद्रयान मोहिमा यशस्वी करण्यासाठी होणार आहे.
🔰अमेरिकेततर्फे येत्या 2024 चंद्रावर माणूस पाठविला जाणार असून या मोहिमेसाठी सुद्धा यामुळे आपला चांगलाच उपयोग करता येणार आहे, असे खगोल अभ्यासक डॉ. प्रकाश तुपे यांनी सांगितले.
🔰मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. सहा अपोलो मोहिमा, अमेरिकेचा एल आरओ टॉपोग्राफी अभ्यास ,जपानची कायुगा मोहीम अशा चंद्रावरील विविध मोहिमांतमधून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे हा डिजिटल मॅप तयार करण्यात आला आहे.
🔰तसेच दहा वर्षांपासून मॅप तयार करण्याचे काम सुरू होते. येत्या 51 व्या ल्यूनर प्लॅनेटरी सायन्स काँग्रेस मध्ये चंद्राच्या डिजिटल मॅप ची माहिती दाखविली राहणार आहे, असे अमेरिकन जिऑलॉजिकल सवेर्चे संचालक जीम रॅली यांनी नुकतेच सांगितले.
No comments:
Post a Comment