➡️मादागास्करमध्ये आलेल्या ‘डियाने’ चक्रीवादळानंतर चालविलेल्या 'ऑपरेशन व्हेनिला' या मोहिमेच्या अंतर्गत तिथल्या लोकांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारतीय नौदलाचे ‘ऐरावत’ जहाज पाठवले गेले आहे.
➡️1 जानेवारी 2020 रोजी भारताने जीवनावश्यक साहित्य मादागास्करच्या अधिकार्यांकडे सोपवल्या.
➡️सेशेल्सकडे मार्गक्रम करणार्या भारतीय जहाजाला विंनतीवरून या बेटराष्ट्राकडे वळविण्यात आले होते.सूचना मिळतास मदतीसाठी पोहचणारा पहिला परकीय देश म्हणून भारत ठरला आहे.
➡️मादागास्करसंदर्भात भारताने दिलेली मदत ही भारताच्या 'सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन (SAGAR)' या दृष्टीकोनातून भारतीय नौदलाच्या परराष्ट्र सहकार्य पुढाकार’च्या अनुषंगाने आहे.
➡️मादागास्कर हा इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA) या आंतर-सरकारी संघटनेचा सदस्य देखील आहे.
➡️हिंद महासागर क्षेत्रात येणार्या संकटकालीन परिस्थितीला प्रतिसाद देणारा पहिला म्हणून भारतीय नौदल उदयास आले आहे.
➡️NS ऐरावत हे एक उभयचर लढाऊ जहाज आहे. हे जहाज मानवतावादी मदत व आपत्ती निवारण (HADR) मोहिमेचा देखील एक भाग आहे, हे आवश्यक मदत साहित्य वाहून नेते.
No comments:
Post a Comment