Tuesday 28 April 2020

स्पॅनिश फ्लूनंतर अर्थव्यवस्था कशी सावरली याचा अभ्यास करावा.

🔰नवी दिल्ली : भारताने १९१८ मधील स्पॅनिश फ्लूची साथ कशी हाताळली होती व त्यावेळी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काय उपाय करण्यात आले होते याचे संशोधन विद्यापीठांनी करावे, असे आवाहन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या शिफारशीत म्हटले आहे की, विद्यापीठांनी कोविड १९ बाबत ग्रामीण भागात किती जागरूकता आहे याचीही तपासणी संशोधनाच्या माध्यमातून करावी.

🔰मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, १९१८ मध्ये जी साथ आली होती ती स्पॅनिश फ्लूची होती त्यावेळी नेमके कोणते उपाय करण्यात आले होते व त्यावेळी अर्थव्यवस्था कशी सावरण्यात आली याचे संशोधन करण्यात यावे अशी अपेक्षा मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

🔰मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, करोना विषाणूशी लढण्यात शैक्षणिक संस्थांनी संशोधनाच्या माध्यमातून मदत करावी.
त्यात सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात करोनाबाबत किती जागरूकता आहे, यावरही संशोधन करून शोधनिबंध सादर करावेत. विद्यापीठे व इतर संस्थांनी आजूबाजूची ५-६ खेडी निवडून हा अभ्यास करावा. कोविड १९ मुळे निर्माण झालेली आव्हाने लोकांनी कशाप्रकारे पेलली यावरही संशोधनातून प्रकाश पडला तर त्याचा फायदा नियोजनात होईल.

No comments:

Post a Comment