उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर. ८५ किमी. रुंद व ३१० किमी. लांबीच्या या अंडाकृती सरोवराचे पृष्ठक्षेत्रफळ १९,४७७ चौ.किमी. असून त्याशिवाय सरावराचे एकूण जलवाहनक्षेत्र ९०,१३० चौ.किमी. आहे. समुद्रसपाटीपासून हे ७५ मी. उंचीवर असून त्याची जास्तीत जास्त खोली २३७ मी. आहे १६१५ मध्ये फ्रेंच समन्वेषक शांप्लँ व त्याच्या सहकाऱ्यांनी या सरोवराचा शोध लावला. १७६३ च्या सुमारास फ्रेंचांकडून याचा ताबा ब्रिटिशांकडे आला. हिमयुगीन घडामोडीत निर्माण झालेली ही सरोवरे आहेत. आँटॅरिओ सरोवराला मिळणारी नायगारा ही प्रमुख नदी असून जेनेसी, ऑस्वीगो व ब्लॅक या दक्षिणेकडून व ट्रेंट ही उत्तरेकडून मिळते. सरोवराच्या अगदी पूर्वेस पाच बेटे असून तेथूनच सेंट लॉरेन्सचा प्रवाह सुरू होतो. किंग्स्टन, टोरँटो, हॅमिल्टन ही या सरोवरावरील कॅनडाची व रॉचेस्टर आणि ऑस्वीगो ही अमेरिकेची प्रमुख बंदरे आहेत. सेंट लॉरेन्स मुखाकडील प्रदेश हिवाळ्यात गोठत असल्याने या सरोवरातून मर्यादित वाहतूक चालते. ईअरी सरोवराशी नायगारा धबधबा टाळून वेलंड कालव्याने व ह्यूरन सरोवराशी ट्रेंट कालव्याने हे जोडलेले आहे. ‘सेंट लॉरेन्स सी वे’ झाल्यापासून वाहतुकीत सुधारणा झाली आहे.
Sunday, 19 April 2020
आँटॅरिओ सरोवर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? ~मोठ्याने हसणे . २】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी . न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखि...
No comments:
Post a Comment