Sunday, 19 April 2020

माजी बाॅक्सिंगपट्टू जयवंत मोरे कालवश


🔰 दिवंगत रूसी इंजिनीयर यांनी घडविलेल्या जयवंत मोरे हे बडी डिसूझा आणि सॅमी खटाव यांच्या तालमीत घडले. १९६२ ते १९८४ पर्यंतचा काळ जयवंत मोरे यांनी गाजवला.

🔰 बेडर, चपळता आणि अप्रतिम पदलालित्य तसेच तंत्रशुद्ध बॉक्सिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या जयवंत मोरे यांनी तब्बल ११ वर्षे अखिल भारतीय रेल्वे अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

🔰 तसेच सर्वोत्तम तंत्रशुद्ध बॉक्सरचा किताब त्यांनी १६ वेळा मिळवला होता.

🔰 फ्लायवेट गटात खेळणारे आणि जेमतेम ३८ किलो वजन असलेले मोरे स्पर्धेदरम्यान केळी खाऊन आपले वजन वाढवत; पण त्यांची चपळता आणि पदलालित्य पाहून भलेभले प्रतिस्पर्धी थक्क होत. प्रतिस्पध्र्याच्या चुका हेरून अचूक ठोसे लगावण्यात त्यांचा हातखंडा होता.

🔰 आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर ते कोणत्याही प्रतिस्पध्र्याला वरचढ ठरण्याची संधी देत नसत. ६०च्या दशकात सिद्धार्थ महाविद्यालयाकडून मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोरे यांनी अखिल भारतीय विद्यापीठाच्या स्पर्धा गाजवल्या होत्या.

🔰 जवळपास पाच दशके प्रशिक्षक म्हणून कारकीर्द बजावणाऱ्या जयवंत मोरे यांनी राष्ट्रीय स्तरावरील अनेक चांगले बॉक्सर घडवले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...