Sunday 20 November 2022

समाजसुधारक :- स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले

स्रियांच्या पायातील गुलामीच्या बेड्या तोडून स्रियांना चूल आणि मुलाच्या पलीकडचे जीवन दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी. म्हणून जाणून घेऊयात त्यांच्या जीवनाचा प्रवास.

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 साली त्यांचा जन्म झाला. आई सत्यवती तर वडील खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील होते. सावित्रीबाईंचे लग्नाच्या वेळी अवघे 9 वर्ष वय तर ज्योतिरावांचे वय 13 होते.

ज्योतिराव मूळचे फुरसुंगीचे. परंतु पेशव्यांनी बक्षीस म्हणून त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन दिली. त्यानंतर ज्योतिरावांच्या वडिलांनी बागेतील फुलाचा व्यवसाय करून त्यांना 'फुले' आडनाव मिळाले.

जातिव्यवस्थेच्या विरोधात जाऊन त्यांनी फुले दाम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनी विवाहानंतर शिक्षण घेतले आणि आधी शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.

त्यांचे शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. शिक्षण प्रसार सुरु असताना सनातन्यांनी धर्म बुडाला..जग बुडणार... असा कांगावा करत उच्च वर्णीयांनी त्यांना प्रचंड विरोध केला, त्यांच्या अंगावर शेणही फेकण्यात आले परंतु त्या डगमगल्या नाहीत.

1854 साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. ‘काव्यफुले’ हे नाव अतिशय समर्पक आहे. या नावात गुंफलेला ‘फुले’ हा शब्द एकाचवेळी दोन गोष्टी स्पष्ट करतो.

शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार सुरु असताना त्यांनी पाहिले की लहानपणीच लग्न झालेल्या मुलींना पतीच्या निधनानंतर सती जावे लागे. या जुन्या रूढी परंपरा बंद करण्याचा विडा त्यांनी उचलला होता.

त्यांनी केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांना प्रबोधन करून त्यांचा संप घडविला होता. पुनर्विवाह कायदा होण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पती महात्मा फुले (1890) यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा संभाळली.

1896 च्या दुष्काळात पोटासाठी शरीराची विक्री करणाऱ्या स्रियांची त्यांनी धनदांडग्याच्या तावडीतून सुटका करून सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले. अठराव्या शतकात प्लेगच्या साथीने थैमान घातले. पुण्यातील प्लेगबाधितांना इंग्रजांनी एका माळावर दवाखाना सुरु करून उपचार चालू केले.

या दवाखान्यातील प्लेगबाधित रुग्णाची सेवा सावित्रीबाई फुले करू लागल्या, सेवा करत असतानाच त्यांना प्लेगची बाधा झाली आणि अशातच 10 मार्च 1897 साली त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...