🔰करोना व्हायरसमुळे जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (IOC) योग्य वेळी स्पर्धे संदर्भातील निर्णय घेऊ असे म्हटले आहे. तर जपानचे पंतप्रधान स्पर्धा स्थगित किंवा पुढे ढकलण्याची गरज नसल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर एक मोठा धक्का बसला आहे.
🔰कॅनडाने ऑलिम्पिक २०२०मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी रविवारी ही घोषणा केली. कॅनडाच्या ऑलिम्पिक समितीने आणि पॅराऑलिम्पिक समितीने करोना व्हायरसमुळे २०२०मध्ये होणाऱ्या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणार नसल्याचे म्हटले आहे.
🔰याशिवाय गेल्या ४८ तासात कॅनडा अनेक देशातील ऑलिम्पिक समिती आणि क्रीडा संघटनांना जुलैपासून सुरू होणारी ही स्पर्धा स्थगित करण्याची मागणी करण्यास सांगत आहेत. याआधी अमेरिका आणि ब्रिटनच्या ऑलिम्पिक समितीने ही स्पर्धा स्थगित करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण या वर्षीच्या स्पर्धेतून एखाद्या देशाने माघार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
🔰करोना व्हायरसमुळे जगभरात १३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा वेळी ऑलिम्पिकचे आयोजन करणे अशक्य वाटत आहे. कॅनडाच्या ऑलिम्पिक समिती आणि पॅराऑलिम्पिक समितीने दोन्ही स्पर्धा एक वर्षासाठी स्थगित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील विनंती त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला देखील केली आहे.
🔰सध्याच्या परिस्थितीत ही स्पर्धा स्थगित करणे योग्य ठरले.खेळाडूंची सुरक्षितता आणि जगाचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचे कॅनडाच्या समितीने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment