Tuesday, 28 April 2020

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी ‘एडोफोक्स’ अ‍ॅपची निर्मिती.


🔰कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर  करावी लागली तसेच सर्व प्रकारच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या.त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

🔰तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन माध्यमांचा वापर करुन पर्याय शोधण्यात येत आहे. मात्र, तरी त्यातून आजमितीला समाधानकारक मार्ग निघाला आहे असे ठोसपणे म्हणता येणार नाही.

🔰त्याच धर्तीवर लातूर व पुणे येथील मित्रांनी एकत्र येत अतिशय सोप्या पध्दतीच्या एका ‘एडोफॉक्स’ या अ‍ॅपची निर्मिती केली असून त्याद्वारे विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था यांना ऑनलाईन शिक्षणाचा एक सक्षम व सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

🔰तर शैक्षणिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून शिक्षण सुरु ठेवण्यासाठी विविध पावले उचलली जात आहे. त्यात झूम, मिंट, गुगल अ‍ॅपसारख्या विविध ऑनलाईन माध्यमांचा उपयोग करुन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment