Wednesday, 8 April 2020

ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वोत्तम विद्यापीठ


लंडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन जागतिक विद्यापीठ अहवाल 2020’ प्रसिद्ध केला. या अहवालानुसार
भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था , रोपार या केवळ दोन भारतीय संस्थांनी या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये जागा मिळविलेली आहे. या दोन संस्थांनी समान गुणासह संयुक्तपणे क्रमांक ‘301-350’ या गटात जागा मिळविलेली आहे.

🔰 अहवालातील महत्वाचे निष्कर्ष:-
• जगातले सर्वोत्तम विद्यापीठ - ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ब्रिटन.

🔰 प्रथम 10 सर्वोत्तम विद्यापीठे
१. ऑक्सफोर्ड विद्यापीठ.( ब्रिटन.)
२. कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका),
३. केंब्रिज विद्यापीठ (ब्रिटन)
४. स्टॅनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका)
५. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका)
६.प्रिन्सटन विद्यापीठ (अमेरिका)
७.हार्वर्ड विद्यापीठ (अमेरिका)
८. येल विद्यापीठ (अमेरिका)
९. शिकागो विद्यापीठ (अमेरिका)
१०. इम्पीरियल कॉलेज लंडन (ब्रिटन)

•  जागतिक क्रमवारीत भारताची उपस्थिती सुधारली असून गेल्यावर्षी केवळ 49 संस्था यादीत समाविष्ट होत्या मात्र या वर्षी 56 संस्थांचा क्रमांक लागला आहे. नवीन IIT इंदौर या संस्थेचे 351-400 गटात स्थान आहे, पंजाब विद्यापीठ, चंदीगड 601-800 या गटात कायम असून IIT गांधीनगर नव्यानेच 501-600 या गटात प्रवेश केला आहे.

• जागतिक क्रमवारीत समाविष्ट केल्या गेलेल्या भारतीय संस्थांच्या संख्येमुळे, भारत हा आशिया खंडात पाचव्या स्थानावर असून जापान आणि चीन अव्वल आहेत

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...