Friday, 10 April 2020

भारताचे संशोधक करोनावर शोधणार लस, ऑस्ट्रेलियाशी केला करार

- आजवर जगभरात सुमारे ८८००० लोकांचा बळी घेणाऱ्या आणि लाखो लोकांना लागण झालेल्या कोरोना विषाणू (कोविड-19)वर लस शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केल्याची घोषणा इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (आयआयएल) या आघाडीच्या लस उत्पादक कंपनीने केली आहे. 

- भारतात हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीसोबत कराराच्या माध्यमातून सहयोग साधला आहे. कोरोना विषाणूवर परिणामकारक लस शोधून काढण्यासाठी या सहयोगातून प्रचंड प्रमाणावर संशोधन हाती घेतले जाणार आहे.

- या दोन खंडांमधील या लक्षणीय सहकार्यामुळे आयआयएल आणि ग्रिफिथ युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया)मधील वैज्ञानिक कोडोन डी-ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून 'लाइव्ह अटेन्युएटेड सार्स - सीओव्ही-2 लस' किंवा कोविड-19 लसीचा शोध लावणार आहेत. अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह हे रोगप्रतिबंधक, सक्रिय, सिंगल डोस प्रतिकारात्मक औषध मानवी शरीरात कोरोना विषाणूंशी लढण्यासाठीची लस तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान आश्वासक आहे. या लसीमुळे एकाच डोसमधून दीर्घकाळ सुरक्षितता आणि इतर अधिकृत सक्रिय रोगप्रतिकारक लसींप्रमाणे लाभ मिळणे अपेक्षित आहे.

- संशोधन पूर्ण झाल्यानंतर या लसीचे अंश इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडला हस्तांतरित केले जातील आणि लस बनवणाऱ्या कंपन्या देशातील सीडीएससीओ (द सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन)च्या नियमनानुसार टप्प्याटप्प्याने पुढील क्लिनिकल चाचण्या घेतील.

- या संदर्भात इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के आनंद कुमार म्हणाले, "या संशोधन सहकार्यातून तातडीच्या सार्वजनिक आरोग्य गरजा पूर्ण करण्यास आयआयएल बांधिल आहे. आयआयएलची मोहीमच आहे 'वन हेल्थ' मोहिमेला पाठबळ देणाऱ्या लसी तयार करणे आणि त्यांचा पुरवठा करणे.

- कोविड-19 या साथीच्या संकटासाठी लस तयार करण्याचा उपक्रम आयआयएलने हाती घेतला आहे. मानवजात आणि प्राण्यांसाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरातील लसी तयार करण्यातील आमच्या नेतृत्व स्थानामुळे या उपक्रमात यश मिळवणे आम्हाला शक्य होणार आहे."

- कोडोना डी-ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानामुळे आम्ही एंटेरोवायरस सी (), ह्युमन इम्युनोडेफिशीअन्सी वायरस टाइप 1, झिका वायरस अशा विविध आरएनए विषाणूंचा प्रसार यशस्वीरित्या कमी करू शकलो आहोत.
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...