Sunday, 12 April 2020

यंदा उन्हाळ्याची सुटी स्थगित करण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय .


⚜दिल्ली उच्च न्यायालयाने यंदा १ ते ३० जून या कालावधीतील उन्हाळ्याची सुटी स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. करोनाच्या फैलावामुळे देशात संचारबंदी जारी करण्यात आल्याने प्रलंबित कामकाजाची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

⚜त्याचप्रमाणे दिल्ली उच्च न्यायालयाने अन्य संबंधित न्यायालयांच्या उन्हाळ्याच्या सुटीलाही स्थगिती दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि अन्य न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला आहे.

⚜देशात संचारबंदी जारी करण्यात आल्याने याचिकाकर्त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयात १६ मार्चपासून केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेतली जात आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न

प्रश्न –: हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे? उत्तर: ओडिशा प्रश्न –: स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर –: सी. राजगोपालाचारी ...