📌बोरघाटातून मुंबई पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल आज (रविवार) तोडण्यात आला. सध्या करोनामुळे असलेल्या लाॅकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याचे निमित्त साधत हे काम करण्यात आले.
📌द्रुतगती मार्ग झाल्यानंतरही अमृतांजन पूलाच्या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होती. हा द्रुतगती मार्ग जरी झाला असला तरी या पुलाजवळील काही प्रवासी पट्टा जुन्या महामार्गाला व द्रुतगती मार्गाला सामाईक आहे त्यामुळेच येथे कायम वाहतूक कोंडी होत असते.
📌यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून पर्यायी मार्ग व उड्डाण पुलांचे काम सुरू आहे. दरम्यान जीर्ण झालेला व अडचणीचा ठरत असलेला हा ऐतिहासिक पूल आज पाडण्यात आला आहे.
📌त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावरील हा १९० वर्षे जुना अमृतांजन पूल आता इतिहास जमा झाला आहे. आज सायंकाळच्या सुमारास हा पूल पाडण्यात आला तेव्हा त्या ठिकाणी काही प्रशासनातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
📌अनेक दिवसांपासून हा पूल पडायचा होता. परंतु, द्रुतगतिमार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते, त्यामुळे ते शक्य होत नव्हते. मात्र, सध्या करोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतमार्गावरील वाहतुक कमी आहे.
📌त्यामुळे हा सर्वात जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात आला. १० नोव्हेंबर १८३० साली अमृतांजन पूल बांधण्यात आला होता.
No comments:
Post a Comment