Sunday 5 April 2020

भूकंप

◾️‘भू’ म्‍हणजे जमीन व ‘कंप’ म्‍हणजे थरथर. भूकंप म्‍हणजे जमिनीचे थरथरणे.

◾️भूकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरांत प्रचंड ताण निर्माण होत असतो.

◾️हा ताण विशिष्‍ट मर्यादेपलीकडे गेल्‍यावर तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो.

◾️ज्‍या ठिकाणी तो मोकळा होतो, तेथे ऊर्जेचे उत्‍सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. त्‍यामुळे भूकवच कंप पावते, म्‍हणजेच भूकंप होतो. 

◾️  भूकवचात ज्‍या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो, त्‍या ठिकाणाला ‘भूकंपाचे केंद्र’ किंवा ‘भूकंपनाभी’ असे म्‍हणतात.

◾️या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जालहरी पसरत असतात.

◾️भूकंपकेंद्रापासून ऊर्जालहरी ज्‍या ठिकाणी सर्वप्रथम पोहचतात त्‍या ठिकाणी भूकंपाचा धक्‍का सर्वप्रथम बसतो.

◾️भूपृष्‍ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्‍हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास (नाभीस) लंबरूप असते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...