Tuesday, 14 April 2020

जागतिक आरोग्य संघटना

🍀🍀(World Health Organisation)🍀🍀

📌संयुक्त राष्ट्र संघटनेची विशेष संस्था आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यावर समन्वय प्राधिकरण म्हणून कार्य करते.
- स्थापना : 7 एप्रिल 1948
- 7 एप्रिल 1948 रोजी जिनिव्हा येथे पहिली जागतिक आरोग्य सभा पार पडली होती.
-मुख्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
- लीग ऑफ नेशनच्या आरोग्य संघटनेची जागा घेतली.
-संयुक्त राष्ट्र विकास गटाची सदस्य संस्था

कार्ये

📌 WHO सार्स, मलेरिया, क्षयरोग, इन्फ्लूएन्झा, एड्स आणि कोविड-19 सारख्या संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी व उपचार करण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे समन्वय करते.

📌 लसीकरण विस्तारीत कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरक्षित आणि प्रभावी लस, फार्मास्युटिकल डायग्नोस्टिक्स आणि ड्रग्सच्या विकासास आणि वितरणाला समर्थन देते.

📌 1980 मध्ये WHO ने देवीच्या रोगाचे (smallpox) निर्मुलन झाल्याचे घोषित केले. मानवाच्या प्रयत्नाने निर्मुलन झालेला हा इतिहासातील पहिला रोग आहे.

महासंचालक
- WHO चे प्रमुख महासंचालक असतात.
- नेमणूक - वर्ल्ड हेल्थ असेंब्ली करते
- सध्या महासंचालक (8 वे) - टेड्रोस अँधनॉम (जुलै 2017 पासून)

जागतिक आरोग्य दिन
- दरवर्षी 7 एप्रिल रोजी पाळला जातो.
.- WHO चा स्थापना दिवस.
- 1950 मध्ये पहिल्यांदा हा दिवस पाळण्यात आला.
- जवाहरलाल नेहरू यांनी हा दिवस सुरु करण्यासाठी WHO ला सल्ला दिला होता.

प्रकाशने
-बुलेटिन ऑफ द ‘हू'
-क्रॉनिकल
-इंटरनॅशनल डायजेस्ट ऑफ हेल्थ
-लेजिस्लेशन
- वर्ल्ड हेल्थ
.
प्रादेशिक कार्यालये (प्रदेश व HQ)
- आफ्रिका - बॅझाव्हिल, काँगो
- अमेरिका - वॉशिंग्टन, अमेरिका
- आग्नेय आशिया - नवी दिल्ली, भारत
- यूरोप - कोपनहेगन, डेन्मार्क
- भूमध्य समुद्र - पूर्वभाग- अलेक्झांड्रिया, ईजिप्त
- पश्चिम पॅसिफिक (सागरीय) - मॅनिला, फिलिपीन्स..

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...