Thursday, 30 April 2020

पृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट.

🔰अंतराळातून रॉकेटच्या तिप्पट वेगाने जाणारा एक मोठा उल्कापिंड 1998 OR2 पृथ्वीच्या जवळून गेला आहे.

🔰या उल्कापिंडमुळे पृथ्वीला कोणताही धोका नव्हता. कारण हा उल्कापिंड 63 लाख किमीवरून पुढे गेला आहे.

🔰तर तो याआधी 12 मार्च 2009 मध्ये पृथ्वीपासून 2.68 कोटी किमी लांबीवरून गेला होता. आता घाबरायचे कारण नसल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.

🔰तसेच हा उल्कापिंड पृथ्वीच्या शेजारून यापुढेही जाणार असून त्याचा वेग पाहता तो 11 वर्षांनी पुन्हा येणार आहे. यावेळी त्याचे अंतर हे पृथ्वीपासून 1.90 कोटी किमी असणार आहे.

🔰हा उल्कापिंड दर 11 वर्षांनी पृथ्वीजवळून जातो. भविष्यात हा उल्कापिंड 2031, 2042 आणि नंतर 2068 व 2079 मध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे.

🔰यापैकी 2079 मध्ये हा उल्कापिंड पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. यावेळी त्याचे अंतर हे आतापेक्षा 3.5 पटींनी कमी असणार आहे. आज हा उल्कापिंड 63लाख किमी लांबून गेला आहे. 2079 मध्ये हा उल्कापिंड 17.73 लाख किमी अंतरावरून जाणार आहे. हे या उल्कापिंडाचे पृथ्वीपासूनचे सर्वांत कमी अंतर असणार आहे.

No comments:

Post a Comment