Saturday, 18 April 2020

भारताच्या जीडीपीची वाढ तीन टक्क्यांपेक्षा खाली घसरण्याची भीती

​🔷

- करोना व्हायरसनं भारतासह जगभरात धुमाकूळ घातलेला असून अर्थव्यवस्थांनाही चांगलाच फटका बसला आहे. करोनाचा उत्पात अर्थव्यवस्थेसाठी यापुढेही जाणवणार असल्याचे समोर येत आहे.

- परिस्थिती अशीच बिकट राहिली तर भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ २०२०-२१ या आर्थिक वर्षात तीन टक्क्यांपेक्षा कमी गतीने होण्याची भीती केपीएमजीनं व्यक्त केली आहे. केपीएमजीनं कोविड-१९ - दी मेनी शेड्स ऑफ क्रायसिस हा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालात मुख्यत: मीडिया व एंटरटेनमेंट क्षेत्राचा आढावा घेण्यात आला आहे.
या अहवालामध्ये केपीएमजीनं तीन शक्यता वर्तवल्या आहेत. जर का आत्ताच करोनाचा प्रसार आटोक्यात आला तर, भारतानं करोनावर नियंत्रण मिळवलं पण जगभरात मंदीची लाट राहिली तर आणि जगभरात मंदीची लाट राहिली व भारतातही करोना आटोक्यात नाही राहिला तर अशा तीन शक्यता केपीएमजीनं विचारात घेतल्या आहेत.

- जर पहिली शक्यता जी अत्यंत सकारात्मक आहे ती वास्तवात आली तर भारताची अर्थव्यवस्था या आर्थिक वर्षात ५.३ ते ५.७ टक्के या गतीने वाढेल. भारतात करोनाची साथ आटोक्यात राहिली परंतु जगभरात मंदी आली तर भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ आणखी मंदावेल व ती अवघ्या ४-४.५ टक्के या गतीने वाढेल. आणि सगळ्यात वाईट स्थिती ओढवली व भारतातही करोनाची साथ इतक्यात नियंत्रणात आली नाही व जगभरात मंदीही कायम राहिली तर मात्र

- भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती तीन टक्क्यांपेक्षा खाली जाण्याची भीती केपीएमजीनं व्यक्त केली आहे.
गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आधीच भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सहा वर्षातल्या नीचांकावर म्हणजे ४.७ टक्क्यांवर होता. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिली तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणखी वाईट स्थिती ओढवण्याची भीती आहे.

- मीडिया व एंटरटेनमेंट सेक्टरसंदर्भात असलेल्या या अहवालामध्ये प्रिंट मीडियासाठी नजीकचा काळ आव्हानाचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जिथं गर्दी होते अशा व्यवसायासाठी म्हणजे चित्रपटगृहांशी संबंधित व्यवसायासाठी खडतर काळ असल्याचे व घरच्या घरी बघता येणाऱ्या करमणूक क्षेत्राची वाढ यापुढेही होत राहील असे नोंदवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...