Thursday, 30 April 2020

आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम.

🔰केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मंगळवारी केली. आयटी क्षेत्रातील ८५ टक्के काम घरुनच केले जात असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले. वर्क फ्रॉम होमसाठी देण्यात आलेल्या कालावधी ३० एप्रिल रोजी संपत होता. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर प्रसाद यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान त्यांनी ही घोषणा केली.

🔰वर्क फ्रॉम होमसंदर्भात सरकारने अनेक सवलती दिल्या असल्याचाही उल्लेख प्रसाद यांनी यावेळी केला. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील आयटी सेक्रेट्री, कम्युनिकेशन सेक्रेट्री आणि पोस्टल सेक्रेट्रींनी प्रेझेंटेशन सादर करुन कोणकोणत्या गोष्टींची राज्यांना केंद्राकडून अपेक्षा आहे हे सांगितले. घरुन काम करण्याचे नियम शिथिल करण्यात आले आहे. “घरुन काम करणे हे सर्वसामान्य व्हावे यासाठी आम्हा प्रयत्नशील आहोत,” असंही प्रसाद यावेळी म्हणाले. तसेच नवीन उद्योजकांनी या संदर्भातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी अशी अपेक्षाही प्रसाद यांनी व्यक्त केली.

🔰सरकारकडून देण्यात आलेल्या सवलतींमध्ये सुरक्षा ठेवींमध्ये सूट, काही ठिकाणी व्हिपीएन न वापरता काम कऱण्याची सूट, घरी काम करण्यासंदर्भात उपकरणे पुरवण्यासाठी परवानगीमध्ये सूट देण्याचा समावेश आहे. १३ मार्च रोजी सरकारने आयटी कंपन्यांनी घरुन काम कऱण्याची परवानगी देण्यासंदर्भात सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार ३० एप्रिलला हा कालावधी संपणार होता. मात्र आता तो वाढवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment