Friday, 3 April 2020

विम्बल्डन टेनिस स्पर्धा द्वितीय महायुद्धानंतर प्रथमच रद्द करण्यात आली.

🎯चार ग्रँडस्लॅमपैकी एक असलेली विम्बल्डन टेनिस स्पर्धा या वर्षी रद्द करण्यात आली असून द्वितीय महायुद्धानंतर पहिल्यांदाच म्हणजेच 75 वर्षांनंतर स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली आहे. पुढील वर्षीची स्पर्धा 28 जून ते 11 जुलै या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याविषयीची घोषणा ऑल इंग्लंड क्लबने केली आहे.

🎯जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नियोजित असलेल्या अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. विम्बल्डन स्पर्धा 28 जून 2020 पासून सुरू होणार होती.

स्पर्धेविषयी

🎯विम्बल्डन अंतिम स्पर्धा ही टेनिस क्रिडाप्रकारातली सर्वात जुनी (सन 1877 सालापासून) आणि सर्वोच्च मानांकित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा लंडन (इंग्लंड) येथील ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोकुएट क्लब येथे खेळली जाते. विंबल्डन विजेत्याला ऑल इंग्लंड क्लबचे सभासदपद दिले जाते. विम्बल्डन ग्रास कोर्टवर खेळवले जाणारे एकमेव ग्रँडस्लॅम आहे.

🎯आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) ही जागतिक टेनिस, व्हीलचेयर टेनिस आणि बीच टेनिस स्पर्धांसाठीची प्रशासकीय संस्था आहे. 1913 साली ‘आंतरराष्ट्रीय लॉंन टेनिस महासंघ’ म्हणून संघाची स्थापना झाले आणि त्याचे मुख्यालय लंडन (ब्रिटन) येथे आहे. आज या संघटनेशी 211 राष्ट्रीय टेनिस संघटना आणि सहा क्षेत्रीय संघटना संलग्न आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी), फ्रेंच ओपन (मे-जून), विंबल्डन (जून-जुलै) आणि यूएस ओपन (ऑगस्ट-सप्टेंबर) या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा ITF तर्फे आयोजित केल्या जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...