🌺कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार करण्यासाठी रेल्वे प्रशासन आयसोलेशन कक्ष तयार करत आहे. यासह मास्क, सॅनिटायझर, नॉन-कॉन्टॅक्ट वाटर कॅप बनवित आहे.
🌺त्याप्रमाणे आता पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी इनटयूबेशन बॉक्स तयार केला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचार करताना सुरक्षितता बाळगण्यासाठी या बॉक्सचा वापर केला जातो.तर रुग्णांच्या डोक्याकडील भाग या बॉक्समध्ये टाकण्यासाठी वक्रकार आकार आहे. या बॉक्सला दोन होल आहेत. या होलातून वैद्यकीय कर्मचारी हात घालून उपचार करू शकतो.
🌺परिणामी, रुग्णाची तपासणी करताना, व्हेंटिलेटर लावताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा थेट संबंध या बॉक्समुळे टाळता येणार आहे.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळता येणे शक्य होणार होणार आहे. या बॉक्सचा आकार 30 बाय 24 बाय 20 असा आहे. हा बॉक्स पारदर्शी असून 2 ते 3 किग्रचा आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
No comments:
Post a Comment